आस्था सोशल फाउंडेशन , रत्नागिरी

मुख्य कार्यालय ब्लॉक नं. 08, सुमंत कॉम्प्लेक्स, चैत्रबन, नाचणे रोड, ता. जि. रत्नागिरी 415 612. महाराष्ट्र (भारत)

हेल्पलाईन +91 9834440200

2500+

लाभार्थी

आमच्या सेवा

प्रत्येक क्षमतेसाठी सर्वांगीण काळजी

आस्था सोशल फाउंडेशनमध्ये आम्ही पुनर्वसनाच्या सर्वांगीण दृष्टिकोनावर विश्वास ठेवतो. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला योग्य वेळी योग्य मदत मिळावी, यासाठी आम्ही विविध विशेष केंद्रांचे जाळे कार्यरत केले आहे. शीघ्र निदानापासून ते विशेष शिक्षण, कायदेशीर मार्गदर्शन आणि कौशल्य विकासापर्यंत, आमची सर्व केंद्रे एकत्रितपणे दिव्यांगांना मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी कार्य करतात. या माध्यमातून प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला स्वावलंबी आणि सन्मानजनक जीवन जगण्यासाठी आम्ही सक्षम करतो.

सुविधा

लोक हितकारक


आस्था शीघ्र निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र

माहिती
आस्था शिघ्र, निदान व शिघ्र हस्तक्षेप केंद्रामध्ये 0 ते 6 वयोगटातील मुलांना वाचा उपचार, भौतिक उपचार, व्यावसायिक उपचार देण्यात येतात.
लवकर निदान
वैयक्तिक थेरपी
तज्ज्ञ मार्गदर्शन
सर्वांगीण विकास

आस्था विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे थेरपी सेंटर

माहिती
आस्था विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे थेरपी सेंटरमध्ये 6 वर्षावरील मुलांना वाचा उपचार, भौतिक उपचार, व्यावसायिक उपचार देण्यात येतात.
विशेष थेरपी सेवा
वाचा उपचार
भौतिक पुनर्वसन
कौशल्य विकास

आस्था विशेष शिक्षण केंद्र

माहिती
आस्था विशेष शिक्षण केंद्र, रत्नागिरी येथे अध्ययन अक्षम मुलांना विशेष शिक्षण व मार्गदर्शन दिले जाते. येथे मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि दैनंदिन कौशल्यांच्या विकासासाठी प्रेमळ व समावेशक वातावरणात प्रशिक्षण दिले जाते.
विशेष शिक्षण
वैयक्तिक लक्ष
कौशल्य विकास
समावेशक शिक्षण
थेरपी सहाय्य

आस्था दिव्यांग हेल्पलाईन

माहिती
आस्था येथे दिव्यांग व्यक्तींसाठी विविध सेवा व माहिती उपलब्ध करून दिली जाते जसे की थेरपी सेवा, अपंगत्व प्रमाणपत्र (UDID), प्रवास सवलती, शासकीय योजना, सहाय्यभूत साधने, आरोग्य विमा, रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन. सर्व सेवा स्वावलंबन, सन्मान आणि सर्वांगीण विकासासाठी दिल्या जातात.
थेरपी सेवा
UDID सहाय्य
प्रवास सवलती
शासकीय योजना
सहाय्यभूत साधने
आरोग्य विमा
रोजगार मार्गदर्शन
समुपदेशन

आस्था दिव्यांग कला व क्रीडा सांस्कृतिक केंद्र

माहिती
दिव्यांग कला व क्रीडा सांस्कृतिक केंद्र या विभागा मार्फत दिव्यांगांच्या कला, क्रिडा व सांस्कृतिक सहभाग, संधी व व्यासपीठ मिळवून देण्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये रत्नागिरी च्या इतिहासात पहिल्यांदा रत्नागिरी जिल्हा अंध क्रिकेट संघाची निर्मिती करण्यात आली आहे.
कला प्रोत्साहन
क्रीडा सहभाग
सांस्कृतिक उपक्रम
अंध क्रिकेट संघ
व्यासपीठ उपलब्धता
कौशल्य विकास

आस्था दिव्यांग वकालत केंद्र

माहिती
आस्था दिव्यांग अ‍ॅडव्होकेसी सेंटरच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या विविध समस्यांवर योग्य स्तरावर त्यांचे प्रतिनिधित्व व पाठपुरावा केला जातो, ज्यामुळे त्यांचे हक्क, समावेशन आणि सेवा मिळण्याची खात्री होते.
हक्क संरक्षण
प्रतिनिधित्व
समावेशन
धोरण सहाय्य
सामाजिक न्याय
मार्गदर्शन

आस्था दिव्यांग नोकरी व्यवसाय व कौशल्य सल्ला-समुपदेशन केंद्र

माहिती
या विभागाद्वारे दिव्यांगाना नौकरी, व्यवसाय, स्वयंरोजगार या बाबत सल्ला समुपदेशन, प्रशिक्षण देण्यात येते
रोजगार मार्गदर्शन
स्वयंरोजगार
व्यवसाय प्रशिक्षण
समुपदेशन
कौशल्य विकास
स्वावलंबन

आस्था दिव्यांग सहाय्यभुत साधने लायब्ररी

माहिती
आस्था दिव्यांग असीस्टीव्ह डिव्हाइस लायब्ररी रत्नागिरी द्वारे दिव्यांगाना आवश्यक असणारे सहाय्यक उपकरणे नाममात्र दरात भाड्याने उपलब्ध करण्यात येतात. त्याचा असंख्य गरीब गरजू दिव्यांग व्यक्तींना लाभ होतो. इत्यादी प्रकल्पाच्या माध्यमातून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य केले जाते.
सहाय्यभूत साधने
परवडणारी सेवा
भाडे तत्वावर सुविधा
हालचाल सहाय्य
समावेशक सेवा
सामाजिक परिणाम

दिव्यांग जाणीव जागृती केंद्र

माहिती
या विभागामार्फत परिस्थितीनुसार दिव्यांगांना आवश्यक माहिती देऊन जाणीव-जागृती करण्यात येते, ज्यामुळे त्यांना त्यांच्या हक्कांची, सेवांची व उपलब्ध संधींची योग्य माहिती मिळते.
जाणीव जागृती
माहिती प्रसार
हक्कांची माहिती
मार्गदर्शन
सक्षमीकरण
समाजभान
: